भाेपाळ : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विराेधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदाेलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रघुनंदन शर्मा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांच्यावर टीका केली आहे. सत्ता डाेक्यात गेल्याची टीका शर्मा यांनी केली असून, देश बळकट करण्याच्या दिशेने काम करण्याचा सल्लाही त्यांनी ताेमर यांना दिला आहे.शर्मा यांनी फेसबुकवर एक पाेस्ट टाकली असून, त्यातून त्यांनी ताेमर यांच्या कार्यशैलीवर जाेरदार टीकास्त्र साेडले आहे. त्यांनी ताेमर यांना उद्देशून लिहिले की, तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात. शेतकऱ्यांना मदत करण्याचा तुमचा हेतू असायला हवा. मात्र, तसे हाेताना दिसत नाही. त्यांना तुमची मदत नकाे असल्यास हा चांगुलपणा काय कामाचा? त्यांना तसेच राहायचे असेल तर बळजबरी करून काय उपयाेग हाेणार आहे. आज सत्ता तुमच्या डाेक्यात गेली आहे. तुम्ही जनाधार का गमावत आहात? काॅँग्रेसची धाेरणे आपण राबवत असून, ते आपल्या हिताचे नाही, असे खडे बाेल शर्मा यांनी सुनावले आहेत. राष्ट्रीयत्व बळकट करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न करा अन्यथा आपल्याला पश्चाताप करावा लागेल. तुम्ही तुमच्या यशाची फळे चाखत आहात, असे वाटत असेल तुम्ही चुकत आहात. शेतकऱ्यांना शांततेत निदर्शने करू द्यावीतवॉशिंग्टन : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना मोदी सरकारने शांततापूर्ण निदर्शने करू द्यावीत, त्यांना आंदोलनस्थळी इंटरनेटही उपलब्ध असावे, असे अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीने म्हटले आहे.भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेर्मन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी स्टीव्ह चॅबॉट तसेच अमेरिकी काँग्रेस सदस्य आर. ओ. खन्ना हे उपस्थित होते. हक्कांची गळचेपी नको : संयुक्त राष्ट्रेनव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क शेतकऱ्यांना बजावू द्यावा, त्यांच्या मानवी हक्कांची गळचेपी करू नये असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषयक विभागाने भारताला सांगितले आहे. शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येकाचा व शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 6:29 AM