नवी दिल्ली: आज देशभरात शेतकऱ्यांनी १२ ते ४ या वेळेत चार तास रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. विशेषत: पंजाबमध्ये जाणाऱ्या लोकांना आज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शंभू सीमेवर शेतकरी आंदोलक रेल्वे रुळावर बसले आहेत. मोहाली रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सरसिनी रेल्वे ट्रॅकवरही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रखडल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी संघटनांच्या 'रेल रोको' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमधील देविदासपुरा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.