चंडीगड : पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कृषी मंत्री अर्जुन मुंडा, गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तूरडाळ, उडीद डाळ, मसूर डाळ व मका उत्पादकांशी सहकारी संस्था ५ वर्षांचा करार करतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला हाेता.
उद्या पुन्हा दिल्लीकडे करणार कूच
सरकारच्या प्रस्तावावर आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली. या प्रस्तावामुळे आम्हाला काेणताही फायदा हाेणार नाही. आम्हाला २३ पिकांसाठी हमीभावाचा कायदा हवा आहे.
२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू होईल, असे शेतकरी नेते जगजित सिंह दल्लेवाल, सर्वनसिंग पंढेर म्हणाले.
आंदोलनात सहभागी आणखी दोन शेतकऱ्यांचा साेमवारी मृत्यू झाला.