वाढीव मुदतीत पीक विमा काढणारे शेतकरी लाभापासून वंचित
By admin | Published: September 04, 2015 9:54 PM
ब्राी खुर्द : शासनाने यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत १५ दिवसांनी वाढविली आहे. मागील वर्षीसुद्धा पीक विमा काढण्याच्या मुदतीत १५ दिवसांची वाढ केली होती; परंतु त्यानुसार वाढीव मुदतीत पीक विमा काढलेल्या ब्राी परिसरातील शेतकर्यांना अद्यापही पीक विम्याच्या परताव्याची रक्कम मिळालेली नाही. सदर शेतकरी पीक विम्याच्या परताव्याच्या लाभापासून अद्यापपर्यंत वंचित आहेत.
ब्राी खुर्द : शासनाने यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत १५ दिवसांनी वाढविली आहे. मागील वर्षीसुद्धा पीक विमा काढण्याच्या मुदतीत १५ दिवसांची वाढ केली होती; परंतु त्यानुसार वाढीव मुदतीत पीक विमा काढलेल्या ब्राी परिसरातील शेतकर्यांना अद्यापही पीक विम्याच्या परताव्याची रक्कम मिळालेली नाही. सदर शेतकरी पीक विम्याच्या परताव्याच्या लाभापासून अद्यापपर्यंत वंचित आहेत.यंदाच्या खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने यावर्षी प्रीमिअम भरण्यासाठी शेतकर्यांना ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. त्यात आता १५ दिवसांची वाढ केली आहे. मागील वर्षीदेखील शासनाने प्रथम पीक विमा काढण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. त्यानंतर ती मुदत १५ दिवसांनी वाढविली होती. त्यानुसार १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांना नापिकी होऊन त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली. ३१ ऑगस्टपर्यंत पीक विमा काढणार्या शेतकर्यांना पीक विम्याच्या परताव्याची रक्कम मिळाली; परंतु १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यत वाढीव मुदतीत पीक विमा काढणार्या शेतकर्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. मागील वर्षी ३१ ऑगस्टनंतर पीक विमा काढणार्या शेतकर्यांना शासनाकडून न्याय दिला जाईल या आशेवर तालुक्यातील शेतकरी आहेत.कोट मागील वर्षी ३१ ऑगस्टनंतर वाढीव मुदतीत पीक विम्याचे प्रीमिअम भरले. अद्यापपर्यंत पीक विम्याच्या परताव्याची रक्कम मिळाली नाही. संबंधित काहीच सांगत नाहीत.अंगतराव आटोटे,शेतकरी,आमतवाडा००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००