पन्ना : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका गावातील एका गृहलक्ष्मीला हिऱ्याने मालामाल केले आहे. हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यातील उथळ खाणीतून या महिलेला दर्जेदार २.०८ कॅरेटचा हिरा सापडला असून, त्याची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मौल्यवान हिरा सापडलेल्या महिलेचे पती शेतकरी आहेत. त्यांनी सांगितले की, हिऱ्याला लिलावात चांगली किंमत मिळाली, तर त्या पैशांतून पन्ना शहरात घर खरेदी करण्याची इच्छा आहे.
घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण चमेलीबाईंना हा मौल्यवान हिरा सापडला असून, यामुळे त्यांचे नशीब उजळले. चमेलीबाई इटवाकला गावाच्या रहिवासी आहेत. पन्ना जिल्ह्यातील कृष्णा कल्याणपुरी पटी परिसरात त्यांनी भाडेपट्ट्याने घेतलेल्या खाणीत त्यांना हा मौल्यवान हिरा सापडला, असे पन्ना येथील हिरा कार्यालय अधिकारी अनुपम सिंह यांनी सांगितले.
तीन महिन्यांच्या प्रयत्नांना आले यशहा हिरा चमेलीबाईंना तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर मिळाला. त्यांनी ते हिरा कार्यालयात जमा केला. लिलावानंतर आलेल्या पैशांतून सरकारचे स्वामित्व शुल्क व कर कपात करून बाकी रक्कम त्यांना दिली जाईल.