शहरं
Join us  
Trending Stories
1
रिकाम्या खुर्च्या अन् वाट बघत बसलेल्या ममता...; डॉक्टरांच्या बहिष्कारावर म्हणाल्या, मी राजीनामा द्यायला तयार!
2
राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल
3
“सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावले असेल तर चूकच”; वकिलांनी थेट कायदाच सांगितला
4
पॅरालिम्पिक चॅम्पियनसाठी कायपण! चक्क जमिनीवर मांडी घालून बसले PM मोदीजी
5
LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम
6
“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात
7
अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले?
8
स्टार क्रिकेटरची फिल्मी लव्ह स्टोरी... पहिल्या भेटीत प्रेमात पडला पण लग्न करायला घेतली ५ वर्ष
9
“आधीचे PM इफ्तार पार्टी ठेवायचे, CJI जायचे; गणपतीला गेल्यावर इतका गहजब का?”: फडणवीस
10
भ्रष्टाचार की महागाई म्हणावे...! ७ वर्षांपूर्वी ४२ कोटींना उड्डाणपूल बांधला, आता तोडायला ५२ कोटी खर्च
11
शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं
12
Shams Mulani ला शतकी डाव साधण्याची संधी! अय्यरचा संघ त्याला रोखणार?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज
14
“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी
15
'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...
16
खळबळजनक! महिलेचा हायवेवर सापडला निर्वस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह
17
टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? ICC ने दिली महत्त्वाची अपडेट
18
"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ..."; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल
19
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
20
स्मॉलकॅप शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा; LIC चाही मोठा डाव!

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 4:02 PM

माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली.

अब्दुल्ला म्हणाले, आम्ही लवकरच जागावाटपाची घोषणा करू आणि जाहीरनामाही प्रसिद्ध करू. यावेळी, माध्यमांनी पीडीपीलाही सोबत आणण्यासंदर्भात केलेल्या प्रश्नावरही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. ते म्हणाले, कुण्याही समविचारी पक्षासाठी आमचे दरवाजे बंद नाहीत. भविष्यात कुठल्याही मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो. तसेच, विजयी झाल्यास मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर देणे टाळले.

येथील लोकांनी 10 वर्ष संघर्ष केला -फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘येथील लोकांनी 10 वर्ष संघर्ष केला आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी आशा करतो की राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल. फारूक म्हणाले, आघाडीसंदर्भात आमची चर्चा सुरू आहे. यावर लवकरच काही निर्णय होईल. फुटिरतावादी शक्तींना एकत्रितपणे हाटवण्याचा आमचा संकल्प आहे. आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू. लवकरच जागांसंदर्भातही घोषणा होईल. तसेच, जम्मू-काश्मीरला लवकरच सर्व अधिकार मिळतील, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाचे म्हणजे, ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार, की त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला निवडणूक लढवणार? यासंदर्भात भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. तत्पूर्वी, गेल्या लोकसभा निवडणुकीत उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांचा दारूण पराभव झाला होता.

राहुल गांधी यांची एकत्रितपणे निवडणूक लढण्याची इच्छा -तत्पूर्वी, जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "आम्ही येथे कार्यकर्त्यांना निवडणुकीची माहिती देण्यासाठी आलो आहोत. सर्व विरोधकांना सोबत घेऊन पुठे चालण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना खर्गे म्हणाले, "INDIA चा परिणाम आपण बघितला आहेत. आपण हुकूमशहाला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. त्यांना तीन कायदे मागे घेण्यासही भाग पाडले आहे." 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे