पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरसाठी ३०,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. यामध्ये शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित विकासकामांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी खोऱ्यातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन आणि सांगलदान स्टेशन ते बारामुल्ला स्टेशन दरम्यानच्या ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवला. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पीएम मोदींचे कौतुक केले.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, केंद्र सरकार जे काम करत आहे त्याची आज गरज आहे. आपल्या पर्यटनासाठी आणि लोकांसाठी ते महत्त्वाचे आहे. हे एक मोठे पाऊल आहे, जे आज उचलले आहे. यासाठी मी रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो.
शेतकऱ्यांची मोर्चा उद्या दिल्लीच्या दिशेनं रवाना होणार; सुरक्षा वाढवली, इंटरनेट सेवा स्थगित
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मला आशा आहे की लवकरच कटरा ते सांगलदानपर्यंत रेल्वे सेवा पोहोचेल. आतापर्यंत वाहतुकीबाबत अडचणींचा सामना करावा लागत होता. आता रेल्वे आम्हाला कनेक्टिव्हिटी देईल. आम्हाला याची खूप गरज होती. आपल्या पर्यटनासाठीही हे खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्या लोकांसाठी देखील खूप महत्वाचे आहे. आता आपण इतर भागात सहज जाऊ शकतो. आमच्या मालाची वाहतूक करणेही सोपे होणार आहे, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले.
"हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मी रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो. यासाठी त्यांनी हातभार लावला. आज आपण पहिली पायरी पाहत आहोत. यामध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचेही मी आभार मानू इच्छितो. मला आशा आहे की ही रेल्वे सेवा वरदान ठरेल, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, आमच्या अपेक्षा वर्षानुवर्षे होत्या. यापूर्वी आम्हाला वाटले होते की आम्ही २००८ पर्यंत रेल्वे सेवेशी जोडले जाऊ. आमच्या भागात कामात अनेक अडचणी आहेत. येथे बोगदे बांधावे लागतील. पण, रेल्वे मंत्रालयाने अडचणींवर मात करत पहिले पाऊल टाकले आहे. जून-जुलैपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.