श्रीनगर: भाजपा सरकारने जम्मू- काश्मीमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अजूनही याचा विरोध करण्यात येत आहे. नॅशनल कॅान्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची बहिण सुरय्या आणि मुलगी साफिया यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. कलम 370 हटविल्याप्रकरणी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुरय्या आणि साफिया सामिल झाल्याने पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कलम 370च्या विरोधातील या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर देखील फारुख अब्दुल्ला यांची बहिण सुरय्या आणि मुलगी साफिया यांच्यासह अनेक महिलांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली. पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर देखील आंदोलन न थांबवल्याने पोलिसांनी अखेर आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत आहेत. फारुक अब्दुल्ला श्रीनगरस्थित त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत आहेत. तर ओमर अब्दुल्ला स्टेट गेस्ट हाउसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.