उत्तर प्रदेशमधील एका विद्युत अभियंतेचा मोठा कारनामा उघड झाला. एका अभियंत्याने ऑफिसमध्ये दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील विद्युत विभागात नियुक्त नवाबगंज उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम या अधिकाऱ्याने हा फोटो लावला आहे.
यूपी पॉवर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एम. देवराज यांनी सोमवारी प्रकाश गौतम यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. गौतम यांना या प्रकरणी आधीच निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता दक्षिणाचल विद्युत वितरण निगम लिमिटेडची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे अध्यक्षांनी त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
यासोबतच एसडीओ रवींद्र प्रकाश गौतम यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून असभ्य आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर तपास समितीने वेगवेगळ्या स्तरावर चौकशी केली आणि आरोप योग्य ठरल्यानंतर आता त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
हे प्रकरण गेल्या वर्षीच्या जून महिन्याचे आहे. एसडीओ रवींद्र प्रकाश गौतम यांच्या कार्यालयातील ओसामा बिन लादेनचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ओसामाबीन लादेनचा फोटो आपल्या कार्यालयात लावण्यासोबतच एसडीओने खाली लिहिले होते, 'जगातील सर्वोत्तम अभियंता आदरणीय ओसामा बिन लादेन जी.'
याचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. व्हिडीओ तपासल्यानंतर, जेव्हा आरोप खरे असल्याचे आढळले तेव्हा अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत रवींद्रला निलंबित केले आणि लादेनचे फोटो कार्यालयातून काढून टाकले. यासोबतच दक्षिणांचल विद्युत वितरण निगमला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी तपास पथकाने रवींद्र गौतम यांच्याकडून हे फोटो पोस्ट करण्याबाबत स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी 'कोणीही कोणालाही आपला गुरू मानू शकतो', असे सांगितले. त्याने फक्त दहशतवादी ओसामा बिन लादेनला जगातील सर्वोत्तम अभियंता असे वर्णन केले आहे. गौतम म्हणाला की तो ओसामाच्या कार्याला अनुसरत नाही किंवा त्याला आपला आदर्श मानत नाही, पण तो जगातील सर्वोत्तम अभियंता होता हे देखील पूर्णपणे सत्य आहे, त्यामुळे लादेनचा फोटो पोस्ट करणे हे चुकीच्या हेतूकडे निर्देश करत नाही, असं त्याने सांगितले आहे.