शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

ओसामा बिन लादेन माझा गुरू, अधिकाऱ्यानं कार्यालयात फोटो लावला; प्रशासन हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 1:02 PM

फर्रुखाबादच्या नवाबगंज परिसरात असणाऱ्या वीज नियामक कार्यालयात हा प्रकार घडला आहे.

फर्रुखाबाद - क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन ज्यानं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करत अमेरिकेला हादरवलं. ही दुर्देवी घटना आजही लोकांच्या मनात कायम आहे. आता ओसामा बिन लादेन या जगात नाही मात्र उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जगातील अत्यंत क्रूर समजल्या जाणाऱ्या ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याला गुरू मानून एका अधिकाऱ्याने चक्क त्याच्या कार्यालयात लादेनचा फोटो लावल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. 

फर्रुखाबादच्या नवाबगंज परिसरात असणाऱ्या वीज नियामक कार्यालयात हा प्रकार घडला आहे. याठिकाणी ओसामा बिन लादेनचा फोटो भिंतीवर लावल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. इतकेच नाही तर ओसामा बिन लादेनच्या फोटोखाली त्याला जगातील सर्वश्रेष्ठ अभियंता म्हणून उल्लेख केला आहे. त्याखालोखाल एसडीओ रविंद्र प्रकाश गौतम यांचं नाव लिहिण्यात आले आहे. या व्हायरल फोटोनंतर वरिष्ठ अधिकारीही खडबडून जागे झाले आहेत. अधीक्षक अभियंता एसके श्रीवास्तव म्हणाले की, या घटनेच्या चौकशीसाठी कमिटी नेमण्यात आली आहे. कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल. फर्रुखाबादच्या नवाबगंज येथील वीज नियामकाच्या कार्यालयात प्रतिक्षालयाच्या भितींवर ओसामा बिन लादेनचा फोटो लावल्याचं व्हायरल झाले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली. 

इतकेच नाही तर या प्रकरणी अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यांना काही माध्यम प्रतिनिधींनी फोन केला असता त्यांनी सांगितले की, दहशतवादी ओसामा बिन लादेन माझा गुरू आहे. हा फोटो जर कुणी हटवला तर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी तो लावला जाईल. कार्यालयात हा फोटो माझ्याकडून लावण्यात आला होता असं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. मात्र या घटनेची माहिती व्हायरल झाल्यानंतर आता सगळीकडे या प्रकाराची भलतीच चर्चा सुरू झाली आहे. 

वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याला २१ वर्षे पूर्णअमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन जुळ्या इमारतींवर ११ सप्टेंबर २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींमध्ये विमाने आदळवण्यात आली होती. यामध्ये २९८३ लोक मारले गेले होते. या हल्ल्यामध्ये अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात होता. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून अल कायदाचे कंबरडे मोडले होते. ओसामा पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये पाकिस्तानी छावणीजवळ राहत होता. अमेरिकेने एका मोहिमेत २०११ मध्ये त्याला ठार केले होते. 

टॅग्स :Osama Bin Ladenओसामा बिन लादेन