शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

आता नो कॅश, फक्त FASTag; १ जानेवारीपासून राष्ट्रीय टोलनाक्यांवर रोख टोलवसूली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 4:30 PM

जुन्या आणि नव्या सर्वच प्रकारच्या गाड्यांसाठी आता सरकारनं FASTag बंधनकारक करण्याचा घेतला आहे निर्णय.

ठळक मुद्देजुन्या, नव्या सर्वच गाड्यांसाठी FASTag अनिवार्यटोल वसूली वाढेल आणि वाहनांच्या रांगाही कमी होईल, असा सरकारचा विश्वास

केंद्र सरकारनं जुन्या आणि नव्या सर्वच गाड्यांना आता FASTag अनिवार्य केला आहे. १ जानेवारी २०२१ पासून देशभरात हा नियम लागू होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं सर्व जुन्या गाड्यांनाही FASTag आता बंधनकारक केला आहे. तर दुसरीकडे NHAI नंदेखील १ जानेवारीपासून रोख रकमेद्वारे टोल वसूली बंद केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता यापुढे FASTag द्वारेच टोलवसूली होणार आहे. दरम्यान, यामुळे टोल वसूलीही वाढेल आणि वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगाही कमी होतील, असं सरकारचं म्हणणं आहे. कार, ट्रक, बस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या खासगी आणि कमर्शिअल वाहनांना टोल नाक्यांवरून पुढे जाण्यासाठी आता FASTag आवश्यक असणार आहे. वाहन चालकांकडे FASTag खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशभरातील कोणत्याही टोल नाक्यांवरून वाहन चालकांना FASTag खरेदी करता येऊ शकतो. त्यासाठी केवळ चालकांना आपल्या गाडीच्या नोंदणीची कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. FASTag खरेदी करण्यासाठी ही केव्हायसी प्रक्रिया आहे. तर दुसरीकडे FASTag हा तुमच्या बँकेद्वारे, अॅमेझॉन, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँकसारख्या ठिकाणांहूनही खरेदी करता येणार आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस या बँकांमधूनही FASTag खरेदी करता येऊ शकतो.काय असेल किंमत ?FASTag ची किंमत ही दोन बाबींवर अवलंबून आहे. पहिली म्हणजे तुमचं वाहन हे कोणत्या श्रेणीतील आहे आणि दुसरी बाब म्हणजे तुम्ही FASTag कुठून विकत घेत आहात. प्रत्येक बँकेची FASTag साठी सिक्युरिटी डिपॉझिटसाठी निरनिराळी पॉलिसी आहे. जर तुम्ही पेटीएमवरून FASTag खरेदी करत असाल तर तो तुम्हाला ५०० रूपयांना मिळेल. यामधअये २५० रूपयांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट आणि १५० रूपयांचा बॅलन्स देण्यात येतो. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेतून FASTag खरेदी केला तर त्यासाठी ९९ रूपयांची इश्यू फी आणि २०० रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावं लागतं. 

कसं कराल रिचार्ज?FASTag रिचार्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे ज्या बँकेतून तुम्ही ते घेतलं आहे त्याद्वारे तयार करण्यात आलेलं FASTag वॉलेट डाऊनलोड करा आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ते रिचार्ज करा. तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही पेटीएम, फोन पे सारख्या मोबाईल वॉलेटद्वारेही FASTag रिचार्ज करू शकता. तसंच अॅमेझॉन पे आणि गुगल पे वरही हा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग्स :carकारNational Highwayराष्ट्रीय महामार्गtollplazaटोलनाकाNitin Gadkariनितीन गडकरी