नवी दिल्ली - मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza) डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital Payment) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे. M आणि N कॅटेगरीमधील वाहनांनादेखील फास्टॅगचा स्टीकर लावावा लागेल. केंद्र सरकारने सेंट्रल व्हेईकल रुल्समध्ये (CMVR, 1989) बदल केले आहेत.
जाणून घ्या, मोटर व्हेईकल नियम 1989
नियमानुसार, 1 जानेवारी 2017 नंतर विकण्यात आलेल्या सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग असणं बंधनकारक होतं. त्यावेळी सर्व नव्या वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला होता. फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी फास्टॅग गरजेचा केला होता. गाडीला नॅशनल परमीट मिळण्यासाठीही फास्टॅग आवश्यक असेल असा नियम 1 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आला होता. आता थर्ड पार्टी इशुरन्ससाठीदेखील फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून हा निमय लागू होणार आहे. तुमच्या वाहनाला फास्टॅग लावल्यामुळे वेळेची आणि इंधनाची नक्कीच बचत होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने फास्टॅग काढता येऊ शकतो.
फास्टॅग कसा काढायचा?
- फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे.
- या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल.
- बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे.
- Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही फास्टॅग काढू शकता.
फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?
- जर तुम्ही फास्टॅग बँक खात्यासोबत लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही.
- तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल.
- फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता.
एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही. दोन गाड्या असल्यास दोन वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.