कानपूर - जगातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाखांच्या वर गेली असून, मृतांचा आकडा 5 लाखांच्या वर गेला आहे. सर्वाधिक म्हणजे 26 लाख 37 हजार रुग्ण एकट्या अमेरिकेत असून, तिथे मृतांचा आकडा 1 लाख 29 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. रुग्णांच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा मृत्युदर जगात बराच कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही देशात अधिक आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल पाच लाखांच्या वर गेली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात एका चिमुकल्याची उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे उपचारासाठी आई-वडील आपल्या एक वर्षाच्या लेकाला घेऊन रुग्णालयात गेले. चिमुकल्याला खूप ताप होता. तसेच घशात सूज होती. मात्र मुलावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला. मुलाच्या वडिलांनी त्यांना अनेकदा विनवण्या केल्या मात्र डॉक्टरांनी मुलाला स्पर्शही केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उपचारासाठी मुलाला रुग्णालयात घेऊन गेलो मात्र मदतीसाठी कोणीही आलं नाही. मुलावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन पित्याने टाहो फोडला. आपल्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांचा आक्रोश पाहायला मिळाला. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर टीकेची झोड उठली आहे.
भारतीय समाज पार्टीचे नेते अरुण राजभर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. यूपीतील आरोग्य प्रशासनातील संवेदनशीलता आणि माणुसकी संपली आहे. तापाने फणफणाऱ्या एक वर्षाच्या मुलाचा उपचाराविना मृत्यू झाला. अत्यंद दुर्दैवी घटना आहे. प्रकृती गंभीर असूनही मुलाला दाखल करून घेण्यात आलं नाही. यामुळे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राजभर यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारलं असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
संतापजनक! ई-पास मागितला म्हणून नेत्याची दादागिरी, पोलिसाला केली धक्काबुक्की; Video व्हायरल
काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल
अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...
CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा