झारखंडमधील गिरिडीहच्या बगोदरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आला आहे. एकीकडे वडिलांची चिता जळत होती तर दुसरीकडे मुलगी परीक्षेत पेपर लिहित होती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरैयाटांड गावात राहणारे द्वारिका यादव काही दिवसांपासून आजारी होत. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांचा मृत्यू झाला. त्याचदिवशी लेकीची परीक्षा होती. त्यामुळे जेव्हा घरातून अंत्ययात्रा निघाली. तेव्हा मुलगी देखील आपला पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडली. वडिलांची चिता जळत होती. तर दुसरीकडे मुलगी निशा कुमारी बागोदरमध्ये मॅट्रिकची परीक्षा देत होती. निशा ही गोपालडीह हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिचे केंद्र बागोदर आरके कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये होते.
वडिलांच्या निधनाच्या दु:खात तिने बुधवारी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थिनीला विचारले असता तिने सांगितले की, पेपर चांगला गेला. तिने पुढे सांगितले की वडील काही दिवसांपासून आजारी होते. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ असून त्यात ती सर्वात मोठी असल्याचं म्हटलं आहे.
गोपालडीह हायस्कूलचे शिक्षक राकेश कुमार म्हणाले, वडिलांच्या निधनानंतर निशाला आव्हाने होती, ती तिने स्वीकारली, वडील परत आले नसते. विद्यार्थिनीची एक वर्षाची मेहनत आणि वेळ वाया गेला असता. अशा परिस्थितीत या मुलीने परीक्षा देऊन समाजाला प्रेरणा देण्याचे काम केलं. समाजातील इतर मुलींनाही यातून प्रेरणा मिळून शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करावी. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"