बंगळुरू - राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनात काही तरुणांनी घुसकोरी केल्याचा प्रकार घडल्याने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर, आज दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचीही कसून तपाणसी करुनच त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अगदी पायातील बूटही तपासण्यात आले आहेत. मात्र, बंगळुरूतील प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमात एका व्यक्तीने घुसकोरी करत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेऊन बाहेर नेले. त्यानंतर, त्याकडे चौकशीही करण्यात आली.
कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत बंगळुरुत प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, एका व्यक्तीन मैदानात येऊन मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्यासमोर जाऊन आपली तक्रार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, तैनात असलेल्या पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले. मात्र, या व्यक्तीने मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि राज्यपाल यांच्यासमोर आपल्या शर्टाच्या खिशातून एक पत्र काढून तिथे टाकल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.