मुलाने टाकली बापाच्या डोक्यात मुसळ
By admin | Published: April 18, 2016 12:47 AM
जळगाव: गटारीच्या चेंबरर्सची सफाई करत असताना वडीलांना तेथून घरात जाण्याचे सांगितल्याच्या कारणावरुन बाप व मुलगा यांच्यात वाद झाला. त्यात बापाने मुलाला दगड मारला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मुलाने घरातून मुसळ आणून बापाच्या डोक्यात टाकली. यात ते जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी जुन्या जळगाव भागात घडली.
जळगाव: गटारीच्या चेंबरर्सची सफाई करत असताना वडीलांना तेथून घरात जाण्याचे सांगितल्याच्या कारणावरुन बाप व मुलगा यांच्यात वाद झाला. त्यात बापाने मुलाला दगड मारला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मुलाने घरातून मुसळ आणून बापाच्या डोक्यात टाकली. यात ते जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी जुन्या जळगाव भागात घडली.जुने जळगाव भागात राहणारे लक्ष्मण गंगाराम काळे (वय ५५) हे त्यांच्या घरासमोरील गटारीवर बसलेले होते. मुलगा युवराज काळे (वय २५) व त्यांच्या भाऊबंदकीतील काही जण गटारीचे चेंबर्स साफ करत होते. त्यावेळी युवराज याने वडीलांना घरात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर त्यांनी तु मला सांगतो का म्हणत तेथून उठण्यास नकार दिला.दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला, त्यात वडीलांनी मुलाला दगड मारुन फेकला. त्यामुळे चिडलेल्या युवराजने घरातून मुसळ आणून वडीलांच्या डोक्यात टाकली. भाऊबंदकीच्या लोकांशी वडीलांचा वाद आहे,त्यामुळे तू त्यांचे काम करु नको असे वडीलांचे म्हणणे होते. जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर वडीलांनी शनी पेठ पोलीस स्टेशनला मुलाविरुध्द तक्रार दिली.