‘त्या’ दिवशी वडील राजीव गांधींनी संजय काकांना प्लेन उडवण्यापासून रोखलं, परंतु...; राहुल गांधींचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 05:52 PM2021-09-03T17:52:25+5:302021-09-03T17:53:20+5:30
अलीकडेच भारतीय युवक काँग्रेसनं राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनाचं आयोजन केले होते. त्यात राहुल गांधी त्यांच्या वडिलांसोबत केलेल्या विमान प्रवासाच्या काही आठवणीत शेअर करतात
नवी दिल्ली – पायलट झाल्यानं सार्वजनिक जीवनात खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. मोठ्या दृष्टीने अनेक गोष्टी पाहता येतात असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं गुरुवारी सोशल मीडियाच्या अकाऊंटवर राहुल गांधी यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या विमान चालवण्याच्या छंदावर भाष्य करताना दिसतात. जेव्हाही राहुलचे वडील विमान उड्डाण करत होते तेव्हा आई सोनिया गांधी नेहमी चिंतेत असायची. ज्या दिवशी राजीव गांधी यांचे बंधू संजय गांधी यांचं विमान दुर्घटनेत मृत्यू झाला त्या दिवशी वडिलांनी काकांना विमान उड्डाण करण्यापासून रोखलं होतं असं राहुल गांधी म्हणाले.
अलीकडेच भारतीय युवक काँग्रेसनं राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनाचं आयोजन केले होते. त्यात राहुल गांधी त्यांच्या वडिलांसोबत केलेल्या विमान प्रवासाच्या काही आठवणीत शेअर करतात. राहुल गांधी म्हणतात की, मी माझ्या वडिलांसोबत सकाळी विमानाने निघालो होतो. आम्हा दोघांनाही विमान उड्डाण करणं आवडतं. जेव्हा कधीही वडील विमान उड्डाणासाठी जात होते तेव्हा आई नेहमी चिंतेत असायची. हे खूप धोकादायक होतं त्यामुळे तिला भीती वाटायची. एकदा विमानात काही समस्या निर्माण झाली त्यात राजीव गांधी होते. तेव्हा मला आठवतंय माझी आई खूप घाबरली होती असं त्यांनी सांगितले.
व्हिडीओत राहुल गांधी त्यांचे काका संजय गांधी यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूबद्दलही सांगतात. ज्यादिवशी संजय गांधी यांचा विमानाच्या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला तेव्हा राजीव गांधी यांनी त्यांना रोखलं होतं. माझे काका जे विमान उडवणार होते ते खूप वेगवान होतं. माझ्या वडिलांनी सांगितलं तुम्ही असं करू नका. माझ्या काकांकडे तितका अनुभव नव्हता. माझ्या काकाकडे तीन ते साडे तीनसे तास विमान उड्डाण करण्याचा अनुभव आहे जितका मला आहे. त्यांनी ते विमान नको उडवायला हवं होतं तरीही त्यांनी विमान उड्डाण केले.
नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ २३ जून १९८० मध्ये संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. एक पायलट कसा स्वत:ला नेता म्हणून प्रशिक्षित करतो यावर राहुल गांधी यांनी पायलटमध्ये विशेष गुण असतो जो त्यांना प्रशिक्षण घेताना मिळतो. पायलटला ३० हजार फूट उंचीवर दिसणारं दृश्य त्याच्या नजरेत पाहावं लागतं. जर तुम्हाला कॉकपिटच्या आतील गोष्टीवर लक्ष ठेवता आलं नाही तर समस्या निर्माण होते. ३० हजार फूट उंचीवरील दृश्यावरुन नजर हटवल्यास समस्या येते. त्यामुळेच पायलट आणि मी एकसारखाच आहे. आम्ही दोघंही एकाच ठिकाणी तीक्ष्ण नजरेने पाहतो असं राहुल गांधी म्हणाले.