पिता-पुत्रास लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By admin | Published: July 02, 2015 11:47 PM
चाकूर : पेरणी केलेल्या शेतातून जाऊ नकोस असे सांगणार्या पिता-पुत्रास एकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील उमरगा कोर्ट शिवारात घडली आहे़ याप्रकरणी बुधवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चाकूर : पेरणी केलेल्या शेतातून जाऊ नकोस असे सांगणार्या पिता-पुत्रास एकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील उमरगा कोर्ट शिवारात घडली आहे़ याप्रकरणी बुधवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तालुक्यातील उमरगा कोर्ट येथील नरेश डोंगरे यांनी शेतामध्ये पेरणी केली होती़ गावातील सोमनाथ मोगले हे डोंगरे यांच्या शेतातून जात होते तेव्हा डोंगरे यांनी मोगले यास शेतातून जाऊ नकोस, असे सांगितले़ तेव्हा मोगले याने नरेश डोंंगरे व त्यांच्या वडीलास शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच हातातील दगडाने डोक्यात मारून जखमी केले़ याप्रकरणी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ वलसे करीत आहेत़ दुचाकी पळविलीचाकूर : घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना तालुक्यातील हणमंत जवळगा येथे घडली आहे़ याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तालुक्यातील हणमंत जवळगा येथील लक्ष्मण चाटे यांनी आपली दुचाकी एमएच १३ बीसी ४२८६ ही घरासमोर १७ जून रोजी उभी केली होती़ अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी पळवून नेली़ तिची किंमत २५ हजार रूपये आहे़ याप्रकरणी चाटे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ वलसे करीत आहेत़ फोनवर का बोलतो म्हणून मारहाणचाकूर : फोनवर का बोलतो, असे म्हणत एकास चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील घारोळानजीक घडली आहे़ याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात बुधवारी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घरोळा येथील अंकुश सोळूंके व अन्य तिघांनी झरी बु़ येथील गणपत चव्हाण याच्यावर फोनवर का बोलतोस, असे म्हणत शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच काठीने डोक्यात मारून जखमी केले़ त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकीही दिली़ याप्रकरणी गणपत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ शिवपूजे करीत आहेत़