नवी दिल्ली- NASAचे शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करत लोकांना लुटणाऱ्या वडील व मुलाला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विरेंद्र मोहन बरार (वय 56), नितिन मोहन बरार (वय 30) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांकडे शास्त्रज्ञ वापरत असलेले अॅन्टी रेडीएशन शूज, केमिकल, लॅपटॉप, प्रिंटर, विविध देशांचे लेटरहेड, खोटे आयडी कार्ड आणि एक ऑडी जप्त केली आहे.
विरेंद्र बरार व मोहन बरार यांनी 1.43 कोटी रुपयांनी लुटल्याची तक्रार नरेंद्र नावाच्या एका व्यक्तीने मे 2018मध्ये गुन्हे शाखेकडे केली होती. त्यांनी राइस पुलरमध्ये पैसे गुंतवून त्यातून 100 कोटी रुपये कमावण्याची संधी असल्याती भूरळ पाडली होती. एप्रिल 2015मध्ये राइस पुलर असल्याचं एका व्यक्तीने मला सांगितलं. व ते विकायचं असल्याचंही सांगितलं. त्या व्यक्तीने ला रेहान मेटल यूएसएचे एमडी विरेंद्र बरारला भेटवलं. बरारची कंपनी नासाला राइस पुलर उपलब्ध करुन देत असल्याचं त्याने सांगितलं. या पुलरची किंमत 37 हजार 500 कोटी रुपये असल्याचंही तो म्हणाला होता, असं नरेंद्रने सांगितलं.
राइस पुलर अतिशय शक्तीशाली असून त्याच्या तपासासाठी केमिकल आणि एक किट विकत घ्यावं लागतं. तोच किट वापरून शास्त्रज्ञ राइल पुलरची तपासणी करतात. तपासणीसाठी होणारा खर्च विकत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो असं बरार म्हणाल्याचं नरेंद्रने सांगितलं. टेस्टिंगच्या नावार सुरूवातील 5.6 लाख, 19 लाख, 24.6 लाख आणि 38 लाख बरारने उकळले. त्यानंतर पुन्हा 5.6 लाख, 3.5 लाख आणि 42 लाख त्याने मागितले. धरमशाला येथे टेस्टिंगची जागा नक्की केली. पण नंतर वातावरण योग्य नसल्याचं सांगत त्याने तपासणी रद्द केली. बरार कारण देत असल्याचं लक्षात आल्यावर आपली लुट झाल्याचं नरेंद्रच्या लक्षात आलं.