देहराडून - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झाले. मेजर चित्रेश यांचा येत्या 7 मार्च रोजी विवाह होणार होता. मात्र वडील सांगत असतानाही विवाहाच्या पूर्वतयारीसाठी सुट्टी घेण्यापेक्षा त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले होते. दरम्यान, राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आईडी बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन त्यांना वीरमरण आले. मेजर चित्रेश सिंह यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच त्यांच्या विवाहाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मेजर चित्रेश यांनी आतापर्यंत 25 बॉम्ब निकामी केले होते. अभ्यासात हुशार असलेल्या चित्रेश यांनी मेजर रँकच्या परीक्षेत नववे स्थान पटकावले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतील 1.5 किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी ट्रॅकवर आयईडी बॉम्ब पेरून ठेवल्याची महिती मिळाली होती. त्यातील एक बॉम्ब यशस्वीपणे निकामी करण्यात आला. मात्र दुसरा बॉम्ब निकामी करत असताना बॉम्बचा स्फोट झाला. त्यात मेजर चित्रेश यांना वीरमरण आले.
वडील वाटत होते लग्नाच्या पत्रिका, मुलगा झाला शहीद; मेजर चित्रेश यांची मन हेलावणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:05 PM
पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झाले.
ठळक मुद्दे शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झालेमेजर चित्रेश यांचा येत्या 7 मार्च रोजी विवाह होणार होता. मात्र वडील सांगत असतानाही विवाहाच्या पूर्वतयारीसाठी सुट्टी घेण्यापेक्षा त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले मेजर चित्रेश सिंह यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच त्यांच्या विवाहाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला