बापाचा मृत्यू, मुलाचा जन्म
By admin | Published: July 29, 2016 12:28 AM
जळगाव : ज्या वेळी पित्याचा मृत्यू झाला त्या घटनेच्या काही मिनिटानंतर त्या पित्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंद आणि डोंगराएवढे दु:ख असा प्रसंग शहरातील गवळी वाडामधील रतन गवळी यांच्या कुटुंबियांनी अनुभवला...
जळगाव : ज्या वेळी पित्याचा मृत्यू झाला त्या घटनेच्या काही मिनिटानंतर त्या पित्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंद आणि डोंगराएवढे दु:ख असा प्रसंग शहरातील गवळी वाडामधील रतन गवळी यांच्या कुटुंबियांनी अनुभवला...शहरातील गोलाणी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करणार्या रुपेश रतन गवळी (वय ३०) याचा गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता कुठल्याशा आजाराने मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला ५.३० वाजता पुत्ररत्न प्राप्त झाले. एकाच वेळी दु:ख आणि आनंद अशा प्रसंगाला त्याच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागले. रुपेश हा मनमिळावू स्वभावाचा होता. तो गवळीवाडा, बळीरामपेठ भागात वास्तव्यास होता. त्याच्या पश्चात मुलगा, पत्नी, आई आणि गजानन, दीपक, तुलसी, विष्णू ही भावंडे आहेत. त्याच्यावर गुरुवारी दुपारी ४ वाजता शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झाले. या घटनेमुळे गोलाणी मार्केट परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याच्या मित्र परिवाराने आपला व्यवसाय बंद ठेऊन त्याला आदरांजली वाहिली.