मुलींच्या खांद्यावर निघाली बापाची अंत्ययात्रा
By admin | Published: May 13, 2016 10:35 PM
दोन्ही मुलांचा अकस्मात मृत्यू झालेला असल्याने दगडूलाल किसनलाल मुंदडा या ९१ वर्षीय वृद्धास त्यांच्या सहा मुलींनी खांदा देत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. दगडूलाल मुंदडा हे मूळचे मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ातील छिपावड येथील होते. ते मागील १५ वर्षांपासून गणेश कॉलनीमध्ये राहत होते. सहा मुली व दोन मुले असा परिवार त्यांना होता. परंतु त्यांचा मोठा मुलगा कृष्णकांत मुंदडा यांचा २०१४ मध्ये तर त्यानंतर लहान मुलगा ओमप्रकाश मुंदडा यांचा २०१५ मध्ये अकस्मात मृत्यू झाला. हे मोठे आघात झाल्याने दगडूलाल मुंदडा हे पुरते खचले होते. परंतु त्यांना त्यांच्या मुली पुष्पा जेथले, प्रेमलता राठी, बसंतीबाई सोनी, कलावती अजमेरा, दुर्गाबाई भक्कड, विजयालक्ष्मी लाठी यांनी सावरले. मुलांची कुठलीही उणीव त्यांनी भासू दिली नाही. ते सावरत असतानाच त्यांचे १० मे रोजी वृद्धापकाळाने निधन झ
दोन्ही मुलांचा अकस्मात मृत्यू झालेला असल्याने दगडूलाल किसनलाल मुंदडा या ९१ वर्षीय वृद्धास त्यांच्या सहा मुलींनी खांदा देत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. दगडूलाल मुंदडा हे मूळचे मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ातील छिपावड येथील होते. ते मागील १५ वर्षांपासून गणेश कॉलनीमध्ये राहत होते. सहा मुली व दोन मुले असा परिवार त्यांना होता. परंतु त्यांचा मोठा मुलगा कृष्णकांत मुंदडा यांचा २०१४ मध्ये तर त्यानंतर लहान मुलगा ओमप्रकाश मुंदडा यांचा २०१५ मध्ये अकस्मात मृत्यू झाला. हे मोठे आघात झाल्याने दगडूलाल मुंदडा हे पुरते खचले होते. परंतु त्यांना त्यांच्या मुली पुष्पा जेथले, प्रेमलता राठी, बसंतीबाई सोनी, कलावती अजमेरा, दुर्गाबाई भक्कड, विजयालक्ष्मी लाठी यांनी सावरले. मुलांची कुठलीही उणीव त्यांनी भासू दिली नाही. ते सावरत असतानाच त्यांचे १० मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची दोन्ही मुले हयात नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारेच विधी त्यांच्या मुली पार पाडतील, असा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार १० रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवास त्यांच्या मुलींनी खांदा देत ते वैकुंठधाम येथे नेण्यात आले. नेरी नाका येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.