नवी दिल्ली - हलाला, ट्रीपल तलाक आणि बहुविवाह प्रथेस विरोध करणाऱ्या बरेलीतील निदा खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. इस्लामिक कायद्याला विरोध केल्याचा आरोप निदावर ठेवण्यात आला असून तिला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. याबाबत बरेतील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम यांनी दर्गाह परिसरात माहिती दिली. दर्गाहतील दारुल इफ्ता विभागाने निदाविरुद्ध फतवा जारी केल्याची खुर्शीद यांनी सांगितले.
दर्गाहमधून निदाविरुद्ध फतवा काढल्यानंतर तिचे अन्न-पाणीही बंद करण्यात आले आहे. या फतव्यानुसार निदा आजारी पडल्यास तिला औषधोपचार दिला जाणार नाही. तिच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवासाठी नजमाही पडण्यात येणार नाही. एवढेच नसून तिला स्मशानभूमीत दफन करण्यासाठी जमिनही देण्यात येणार नसल्याचे या फतव्यात म्हटले आहे. निदाविरुद्ध हा फतवा जारी केल्यानंतर निदानेही पत्रकार परिषद घेऊन फतवा जारी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.