नवी दिल्ली : रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या मोटारीखाली चिरडून रस्ता झाडत असलेल्या तीन महिला सफाई कर्मचाऱ्यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर राजधानी दिल्लीत संतापाची लाट उसळली.दोनशे रुपयांची लाच दिली नाही म्हणून एका वाहतूक पोलिसाने स्कूटरस्वार महिलेस भर रस्त्यात विटेने मारल्याच्या सोमवारच्या घटनेच्या पाठोपाठ ही ताजी घटना घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक ऋषीपाल सिंग यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर भादंवि कलम ३०४ (ए) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही घटना मेहरौली-बदरपूर रस्त्यावर घडली. तेथे सहा महिला सफाई कर्मचारी रस्ता झाडत होत्या. पाल यांच्या भरधाव मोटारीने त्यांना उडविले. त्यात शकुंतला (५५), मीरा (५०) व माया (२८) या तिघींचा मृत्यू झाला. या तिघीही मोटारीखाली चिरडून जागीच ठार झाल्या.
फौजदाराने तीन महिलांना चिरडले
By admin | Published: May 13, 2015 2:13 AM