शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला

By admin | Published: April 28, 2015 11:47 PM

देशात फेब्रुवारी २०१५ मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ ६३ टक्क्यांनी वाढून ३.२८ अब्ज डॉलरवर, अर्थात २०,८२० कोटी रुपयांवर पोहोचला.

नवी दिल्ली : देशात फेब्रुवारी २०१५ मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ ६३ टक्क्यांनी वाढून ३.२८ अब्ज डॉलरवर, अर्थात २०,८२० कोटी रुपयांवर पोहोचला. फेब्रुवारी २०१४ मध्ये देशात २.०१ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते फेबु्रवारी या कालावधीत विदेशी गुंतवणुकीचा ओघ ३९ टक्क्यांनी वाढून २८.८१ अब्ज डॉलर झाला. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा २०.७६ अब्ज डॉलर एवढा होता. औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. २०१४-१५च्या पहिल्या ११ महिन्यांत सेवा क्षेत्र (२.८८ अब्ज डॉलर), दूरसंचार (२.८५ अब्ज डॉलर), वाहन (२.४२ अब्ज डॉलर), कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर (२.०४ अब्ज डॉलर) आणि औषधी (१.३० अब्ज डॉलर) या क्षेत्रात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली. या कालावधीत देशात सर्वाधिक ८.४४ अब्ज डॉलरची गुंतवणूक मॉरिशस येथून आली. त्याखालोखाल सिंगापूरहून ६.४२ अब्ज डॉलर, नेदरलँडहून ३.२९ अब्ज डॉलर, जपानहून १.७२ अब्ज डॉलर आणि अमेरिकेहून १.६९ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली. २०१३-१४ मध्ये देशात २४.२९ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती.