शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:14 IST

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यास नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूपाचे असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील, त्यावर तोडगा काढूनच पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले.

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन आणि असंख्य अन्य न्यायमूर्ती व तज्ज्ञांची परिषदेला उपस्थिती होती.

सरन्यायाधीश म्हणाले की, कायदा व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता एआयमध्ये आहे. कायदेशीर संशोधन आणि खटला विश्लेषण यात सुधारणा होऊन न्यायालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढेल. काही नवीन संधीही निर्माण होतील. कामकाजात अभूतपूर्व अचूकता येईल. त्यामुळे एआयचा न्यायालयीन वापर आपण टाळू शकणार नाही. सरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की, असे असले तरी एआयचा न्यायालयीन कामकाजात वापर सुरू केल्यास काही गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

...तर न्यायाचा गर्भपातसरन्यायाधीशांनी सांगितले की, एआयकडून चुकाही होऊ शकतात. चुकीची आणि दिशाभूल करणारे प्रतिसाद येऊ शकतात. त्यातून संवेदनशील प्रकरणांत अयोग्य सल्ला दिला जाण्याचा धोका आहे. असे झाले, तर न्यायाचाच गर्भपात होईल. एआयचा वापर करण्यापूर्वी यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यावर उपाय शोधावे लागतील.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय