शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

पनामाला सतावतेय प्रतिमेची भीती

By admin | Published: April 05, 2016 12:21 AM

विधी संस्थेतून फुटलेल्या दस्तावेजातून जगभरातील अनेक नेते, प्रमुख खेळाडू आणि इतर नामवंतांनी अब्जावधी डॉलरचे घबाड पनामात लपविले असल्याचे संकेत आहेत.

पनामा सिटी : विधी संस्थेतून फुटलेल्या दस्तावेजातून जगभरातील अनेक नेते, प्रमुख खेळाडू आणि इतर नामवंतांनी अब्जावधी डॉलरचे घबाड पनामात लपविले असल्याचे संकेत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर करचोरांचे आश्रयस्थान किंवा हवाला व्यवहाराचे मोठे केंद्र अशी पनामाची प्रतिमा बनण्याची भीती आहे. पनामा हा छोटा देश असून त्याची लोकसंख्या केवळ ४० लाख आहे. प्रसिद्ध पनामा कालवा हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. पनामाने आपली प्रतिमा बदलण्यासाठी अलीकडे पावले उचलली होती. तथापि, रविवारच्या खुलाशानंतर देशाने प्रतिमा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. पूर्ण बेकायदेशीर?या प्रकरणात ज्यांची नावे समोर आली आहेत तो व्यवहार पूर्ण बेकायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आयसीआयजेचे म्हणणे आहे की, हे बेकायदेशीर असू शकते. अर्थात हे पूर्णपणे बेकायदेशीर नसले तरी हे स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे या बड्या लोकांनी कर वाचविण्याचा प्रयत्न करून देशाचे नुकसान केले आहे. कशासाठी विदेशी खाते? मोठे लोक देशाबाहेर जी खाती उघडतात त्यामागे देशातील बँकिंग व्यवस्थेपासून लपवून पैसा बाहेर नेणे आणि टॅक्स वाचविणे हा हेतू असतो. >> काय आहे पनामा प्रकरण?जगभरातील नेते, उद्योजक, खेळाडू आणि अभिनेते आदींनी कथितरित्या कर वाचविण्यासाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी परदेशात केलेल्या गुंतवणूकीबाबतची लाखो कागदपत्रे फुटली आहेत. शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय महासंघाने (आयसीआयजे)ही कागदपत्रे समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या ४० वर्षांतील माहिती यात आहे. जर्मनीतील एका वर्तमानपत्राने म्हटले आहे की, यातून २.६ टेराबाईट डेटा समोर आला आहे, जो की ६०० डीव्हीडीत समाविष्ट होऊ शकतो. जगभरातील किमान १४० बड्या नेत्यांनीही संपत्ती लपविल्याचे यातून समोर आले आहे.>>>>>शरीफांभोवती वादळ इस्लामाबाद : पनामा कागदपत्रांमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या तीन अपत्यांची नावे असल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानात राजकीय वादळ आले असून, विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. कागदपत्रांनुसार, शरीफ यांची अपत्ये एकतर विदेशातील कंपन्यांचे मालक आहेत किंवा या कंपन्यांच्या व्यवहाराचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. शरीफ यांचे पुत्र हुसैन नवाज म्हणाले की, माझ्या परदेशात कंपन्या असल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान शरीफ यांचे नाव नाहक यात ओढण्यात येत आहे. >प्रतिमेला तडाबीजिंग : परदेशात संपत्ती दडविणाऱ्यांमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळच्या नातेवाईकासह सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाच्या आठ विद्यमान किंवा माजी सदस्यांचा समावेश आहे. जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. परंतु पनामा पेपरफुटीमुळे त्यांच्या या प्रतिमेला तडा जाऊ शकतो.‘पुतीन हे लक्ष्य’मॉस्को : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पनामा कागदपत्र फुटीचे प्रमुख लक्ष्य होते, असे सांगत रशियाने सोमवारी या प्रकरणावर हल्लाबोल केला. फुटलेल्या पनामा कागदपत्रांचे रशियन पत्रकारांनी विश्लेषण केल्यानंतर पुतीन यांचे एक घनिष्ठ मित्र परदेशात गुंतवणूक असलेल्या रशियन धनाढ्यांत सर्वात अग्रस्थानी असल्याचे आढळून आले.