बाडमेर: भारत-पाक सीमेवर वसलेले बाडमेरचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर महिलेने ऑपरेशनच्या भीतीपोटी खिडकीची जाळी काढून पळ काढल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांच्या माहितीनंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर महिलेला हॉस्पिटलपासून 10 किमी अंतरावर पकडण्यात आले. गरोदर महिला भेटल्यानंतर कुटुंबातील सदस्य, रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी सुटकेचा नि: श्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखसिंग नावाच्या व्यक्तीची पत्नी सरोजची पहिली डिलिव्हरी ऑपरेशनद्वारे होणार होती. यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरोजला ऑपरेशन करुन डिलिव्हरी नको होती. ऑपरेशनच्या नावानेच ती खूप घाबरली होती. ऑपरेशनच्या भीतीने घाबरलेल्या सरोजने बुधवारी सकाळी वॉर्डच्या खिडकीतील जाळी काढल्यानंतर तेथून उडी मारली. सकाळी 7 च्या सुमारास कुटुंबाला याची माहिती मिळाली.
सरोज आपल्या जागेवर नसल्याचे पाहून त्यांनी घाईघाईने जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि कोतवाली पोलिसांना कळवले. त्यानंतर महिलेचा शोध सुरू झाला. अखेर महिलेची माहिती मिळाली आणि पोलिसांनी जिल्हा रुग्णालयापासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या हर्सानी फांटा जवळून पकडले आणि तिला जिल्हा रुग्णालयात आणले.
महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू
बाल विभागप्रमुख डॉ.कमला वर्मा यांच्या मते, ऑपरेशनच्या भीतीने आई रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून पळून गेली होती. त्याची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर, दुपारी 1 च्या सुमारास ती महिला सापडली आणि पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. तिची तब्येत ठीक असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.