पाटणा - एकीकडे देशातील कोरोनाच्या फैलावाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असताना दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तारीखही जवळ येत आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. बिहारमधील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि जेडीयूचा मित्रपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्यासाठी तयार असल्याचे विधान केले आहे. तसेच कोरोना संकटाचा सामना करण्याच्या नितीश कुमार यांच्या रणनीतीवरही लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.याबाबत चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही. जर एनडीएमधील तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असतील तर तिघांचाही अजेंचा असेल. तसेस बिहारसाठी एनडीएला किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. जर असा कार्यक्रम आता ठरला नाही तर निवडणुकीनंतरही तो ठरणार नाही. तसेच बिहारमध्ये एनडीए किंवा अशा आघाडीचे सरकारा बनेल ज्यामध्ये लोकजनशक्ती पक्ष सहभागी असेल तर ते सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच बनेल.
बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:47 IST
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत
ठळक मुद्देलोकजनशक्ती पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्यासाठी तयार बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही