सुमंगल महिला मंडळातर्फे माता-कन्यांचा सत्कार
By admin | Published: March 14, 2016 12:21 AM
जळगाव : महिला दिना निमित्त सुमंगल महिला मंडळातर्फे महिलाचे आरोग्य आणि समस्या या विषयावर महिलांना मागदर्शन करुन. पहिली कन्या असलेल्या ७ माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
जळगाव : महिला दिना निमित्त सुमंगल महिला मंडळातर्फे महिलाचे आरोग्य आणि समस्या या विषयावर महिलांना मागदर्शन करुन. पहिली कन्या असलेल्या ७ माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता वणी होत्या. प्रमुख अतिथी सुरेखा शिरोळे, डॉ. सुमन लोढा, सुरेखा येवले होत्या.यावेळी डॉ. लोढा यांनी महिलांविषयीचे आजारा, गर्भपेशी व कॅन्सरवर माहिती दिली. हिमोग्लोबीन वाढविणे व कॅन्सरमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. ४० वयानंतर सर्व तपासण्या करुन घेतल्यास आजारांचे निदान होते यामुळे आजारावर उपचार करणे शक्य असल्याचा सल्ला दिला. महिलांनी नैराश्य कसे कमी करावे याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात पहिल्या कन्यारत्नाला जन्म देणार्या छाया खैरनार, गायत्री येवले, कविता देव, पुजा चिंचोले, वैशाली येवले, छाया येवले, शुभांगी येवले या मातांसह कन्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा येवले, सुरेखा शिरोळे, सरला वाणी यांच्यासह महिला मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.