गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
By admin | Published: July 31, 2015 10:25 PM
फोटो ओळी ....मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्कारमूर्ती व उपस्थित मान्यवर.
फोटो ओळी ....मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्कारमूर्ती व उपस्थित मान्यवर.शहीद सफाई दिन : नावासहीत बीटमध्ये फोटो लावणारनागपूर : सफाई कामगार दिनानिमित्त आज शुक्रवारी महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते ५० गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, उपसभापती मीना तिडके, झोन सभापती वर्षा ठाकरे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर आदी उपस्थित होते.शहीद सफाई दिनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते. गुणवंत कामगारांच्या कार्याची दखल म्हणून प्रत्येक झोनमधील तीन सफाई कर्मचारी व दोन ऐवजदार पाच अशा ५० कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहराची स्वच्छता करून सफाई कामगार जनतेची सेवा करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला. गुणवंत कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे एक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करतात त्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन हर्डीकर यांनी केले. डॉ. मिलिंद गणवीर यांनी या वर्षापासून स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक झोनमधून एक महिला व एक पुरुष अशा दोन ऐवजदारांची गुणवंत कामगार म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती दिली. प्रारंभी महापौर व मान्यवरांनी महर्षी सुदर्शन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले. संचालन महेंद्र मनपीया यांनी तर आभार राजेश हाथीबेड यांनी मानले. कार्यक्र माला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)