बटाला : अभिनेता सनी देओल राजकीय मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपाने पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सनी देओल यांनी प्रचाराला जोर धरला आहे. दरम्यान, गुरुवारी सनी देओल यांनी बटालामध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्या एका समर्थक महिलेने सनी देओल यांच्या गालाचा किस घेतला. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
बटालामध्ये सनी देओल यांनी गुरुवारी रोड शो केला. या रोड शो दरम्यान अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एक महिला सनी देओल यांच्या ट्रकवर चढली आणि त्यांची गळाभेट घेत त्यांच्या गालाचा किस घेतला. दरम्यान, ती महिला ट्रकवर चढताना लोकांना वाटले की सनी देओल यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चढत असेल. मात्र, झाले अले की तिने सनी देओल यांच्या गालाचा किस घेतल्याने सर्वजण गोंधळून गेले.
दरम्यान, अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर भाजपाने अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यांना पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब आजमावणार आहेत. सनी देओल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत.
हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!, मोदींच्या हातात 'ढाई किलोचा हात'अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी सनी देओल सोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर करत, आम्ही दोघेही 'हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा'साठी एकत्र असल्याचे म्हटले होते.
सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोलाअभिनेता सनी देओल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला होता. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले होते. यावर सनी देओलकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.