भारतीय महसूल सेवेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने आपले लिंग बदलले आहे. एक ऐतिहासिक निर्णय घेत अर्थ मंत्रालयाने सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव आणि लिंग बदलण्याची विनंती मान्य केली आहे. भारतीय नागरी सेवांमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे.
हैदराबादमधील सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणच्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून सेवेत असलेल्या एम अनुसूया यांनी लिंग आणि नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यांनी आपले नाव बदलून एम अनुकाथिर सूर्या ठेवले आहे. त्यांनी लिंग लिहिण्याच्या कॉलममध्ये स्त्रीच्या जागी पुरुष लिहिण्याची विनंतीही केली.
आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर भीषण अपघात, डबल डेकर बस दुधाच्या टँकरला धडकली; १८ जण ठार
सूर्या यांनी डिसेंबर २०१३ मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर २०१८ मध्ये त्यांना उपायुक्त करण्यात आले. गेल्या वर्षी ते हैदराबादमध्ये सध्याच्या पोस्टिंगवर रुजू झाले. त्यांनी चेन्नईतील मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी २०२३ मध्ये भोपाळ येथील नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमा पूर्ण केला.
सर्वोच्च न्यायालयाने NALSA प्रकरणात ऐतिहासिक निकाल
१५ एप्रिल २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने NALSA प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला होता. लिंग ओळख निवडणे ही कोणाचीही वैयक्तिक निवड आहे, असेही सांगण्यात आले. ओडिशातील एका पुरुष व्यावसायिक कर अधिकाऱ्याने ओडिशा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सामील झाल्यानंतर पाच वर्षांनी २०१५ मध्ये त्याचे लिंग बदलून स्त्री बनवण्याचा निर्णय घेतला होता.