शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

शहीदांच्या वंशजांचा सत्कार

By admin | Published: April 17, 2017 1:57 AM

ब्रिटीश शासनाविरुद्ध १८१७ मध्ये सशस्त्र बंड करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील १६ सदस्यांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित केले

अंबिका प्रसाद ,  भुवनेश्वर कानुनगोब्रिटीश शासनाविरुद्ध १८१७ मध्ये सशस्त्र बंड करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील १६ सदस्यांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित केले. ओडिशातील आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राप्रती त्यांच्या योगदानाचे मोदी यांनी कौतुक केले. बक्की जगन्बंधू, लक्ष्मण नायक, चाकी खुंतिया आदींच्या कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील लिंगराज मंदिरात भेट दिली. ११ व्या शतकातील या मंदिरात त्यांनी फुले, फळे, दूध अर्पण करुन पूजाही केली. या मंदिराची पूर्ण माहिती घेत त्यांनी येथे एक फोटोही काढला. ब्रिटीशांविरुद्धच्या पाईका बंडातील शहीदांच्या वंशजांचा सत्कार मोदी यांनी केला. त्यानंतर ते सुरक्षा व्यवस्थेत लिंगराज मंदिरात दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मंदिर व्यवस्थापन समितीने त्यांचे जोरदार स्वागत केले.मोदी यांनी मंदिरात महादेवाची पूजा केली. यावेळी मोदींनी मंदिर प्रदक्षिणा केली. २५ हजार वर्ग फूट क्षेत्रात वसलेले हे मंदिर ५४ मीटर उंच आहे. या परिसरात १५० लहानमोठे मंदिरे आहेत. भाजपच्या दोन दिवसीय बैठकीत भाग घेण्यासाठी मोदी येथे आलेले आहेत. मोदींच्या रोड-शोमध्ये ११ किमीचा साडीफलकदोन दिवसांच्या गुजरात भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी रात्री येथे अनोखा आणि भव्य असा रोड-शो आयोजित करण्यात आला. सूरत विमानतळ ते सर्किट हाऊस या ११ किमी लांबीच्या रस्त्यावर झालेल्या या रोड-शोने शहर दणाणून गेले. या संपूर्ण ११ किमी अंतरात रस्त्याच्या एका बाजूला लावलेली फलकरूपी साडी हे प्रमुख आकर्षण होते. या साडीवर भाजपा सरकारची कामगिरी आणि कल्याणकारी योजनांची माहिती लिहिण्यात आली होती. सूरतला विमान उतरण्यापूर्वीच मोदींनी टिष्ट्वट करून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचे आभार मानले आणि सूरत भेटीचा आनंद नमूद केला. मोदी यांच्या या भेटीसाठी संपूर्ण शहरभर रोषणाई केल्याचे दिसून येत होते. तसेच अनेक लोक रस्यावर होते.