सटाणा : शहरातील आराई पांधी रस्त्यावरील पाटचारी व रस्त्यालगत असलेल्या बेकायदेशीर झोपड्या व अतिक्र मण पाटबंधारे विभागाने हटविणे आवश्यक असताना सटाणा नगरपरिषदेने या झोपडपीत शौचालय बांधण्याचा घाट घालून एका नव्या वादाला सुरुवात केली आहे.शहरातील आराई बागायत पांधी लगत काही शेतकर्यांच्या जमिनीवर अतिक्र मण करून काहींनी झोपड्या बांधल्या आहेत. अतिक्र मण केलेल्या झोपडीधारकांना नगर परिषदेकडून शौचालय मंजूर करण्यात आले असून, प्रशासनाकडून तशी योजना तयार करण्यात येत आहे. संबंधित जमीनमालकांनी या कामावर हरकत घेतली असून, सटाणा तहसीलदारांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे.शासनामार्फत कोणताही निधी खर्च करताना तो निधी ज्या कामासाठी खर्च करावयाचा आहे त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रि या पार पाडल्याशिवाय कोणताही निधी खर्च करता येत नाही; मात्र आमच्या मालकीच्या शेतजमिनींवर अतिक्रमणधारकांना शौचालय बांधण्याकरिता शासनामार्फत किंवा नगर परिषदेमार्फत आमच्या जमिनी आरक्षित किंवा राखीव केलेल्या नसतानाही आमच्या पूर्वसंमतीशिवाय नगरपरिषदेने शौचालयाला मंजुरी कशी दिली, असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.या जमिनीवर शासनाच्या कोणत्याही विभागाचा मालकीहक्क नसताना पालिकेमार्फत बेकायदेशीरपणे व काही राजकीय नेत्यांच्या पाठबळावर हे बेकायदेशीर काम सुरू करण्याचा डाव असल्याचा आरोप जमीनमालकांनी केला आहे. या प्रकारामुळे जमिनीच्या मालकी हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न नगरपरिषद करत असून, त्यांनी शौचालय बांधण्याला हरकत घेतली आहे. तहसीलदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शौचालय बांधण्याच्या योजनेस प्रतिबंध करावा अन्यथा गांधीगिरीचा अवलंब करून आंदोलनाचा इशारा बाळासाहेब यादवराव सोनवणे, रमेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, पोपट सोनवणे, केशव सोनवणे, समीर पाटील, नंदकिशोर सोनवणे, रामदास सोनवणे, अशोक सोनवणे, तुळशीराम सोनवणे, रेवजी सोनवणे, शरद सोनवणे, माधवराव सोनवणे आदिंनी दिला आहे. (वार्ताहर)
सटाण्यात अतिक्र मित झोपडपीत शौचालय बांधण्याचा घाट
By admin | Published: January 22, 2016 10:41 PM