जकार्ता : इंडोनेशियामध्ये 29 ऑक्टोबरला विमानअपघात होऊन यामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातइंडोनेशियाची तरुणी इंटन स्यारी हिच्या होणाऱ्या नवऱ्याचाही मृत्यू झाला होता. रियो नंदा प्रतामा असे त्याचे नाव होते. विमानात बसण्याआधी त्याने स्यारी हिला फोनवर ''मी जरी आलो नाही, तरीही तू माझ्याशीच लग्न कर'' असे सांगितले होते. यानंतर 13 मिनिटांनी विमानाचा अपघात झाला होता.
लग्नानंतर पतीसोबत संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या स्यारीने प्रतामाच्या मृत्यूनंतर त्याची ही इच्छा पूर्ण केली. स्यारीने 11 नोव्हेंबरला लग्न ठरलेल्या ठिकाणीच पांढऱ्या पोषाखात जाऊन एकटीनेच लग्न केले.
प्रतामा हा लग्नासाठीच लायन्स एअरलाईनने घरी येत होता. त्याच्या मृतदेहाची ओळख 6 नोव्हेंबरला बोटाच्या ठशांनी पटविण्यात आली. यानंतर दोन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतामाने विमान उड्डाणाआधी मस्करी करताना म्हटले होते की, की मी 11 नोव्हेंबरला आलो नाही तरीही माझ्याशीच लग्न कर. मी पंसत केलेलाच लग्नाचा पोषाख घाल. मेकअप करून पांढरे गुलाब मागव. यानंतर फोटो काढून मला पाठवून दे.
गंमतीनुसार जरी प्रतामा या जगात नसला तरीही स्यारीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याच्यासाठी प्रेमाचा संदेश दिला आहे. ''मी प्रतामाची शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छिते. त्याला 13 वर्षांपासून ओळखत होती. तो माझे पहिले प्रेम आहे. मी दुख: व्यक्त करू शकत नाही, पण तुझ्यासाठी नेहमी हसत राहीन. तुझ्या सांगण्याप्रमाणे शूर बनण्याचा प्रयत्न करेन.