भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. २३ जानेवारी रोजी कलवरी श्रेणीच्या पाचवी पाणबुडी वगीरचा आयएनएसमध्ये समावेश होणार आहे. या पाणबुडीची निर्मिती माझगाव डॉक मुंबईमध्ये फ्रान्सच्या सहकार्याने केले जात आहे. कलवरी वर्गातील ही पाचवी पाणबुडी असून, चार पाणबुड्या यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. MDL ने नोव्हेंबर २०२२ मध्ये ही पाणबुडी नौदलाकडे सुपूर्द केली.
यापूर्वी, वगीर पाणबुडी १९७३ मध्ये नौदलात सामील झाली होती, तिच्या संपूर्ण ३० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक ऑपरेशन्समध्ये सहभागी झाली होती आणि २००१ मध्ये नौदलातून निवृत्त झाली होती. याच पाणबुडीच्या नावावरून या पाणबुडीला नाव देण्यात आले आहे.
२६/११ची साक्षीदार देविका ‘भारत जोडो’त; यात्रेच्या समारोपात विरोधी पक्ष दाखवणार एकजूट
२४ महिन्यांत २ सर्वात घातक पाणबुड्या भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत आणि तिसरी पाणबुडी २३ जानेवारी रोजी भारतीय नौदलात सामील होत आहे. कलवरी श्रेणीची पाणबुडी INS वगीर भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन वर्षांच्या सागरी चाचण्यांनंतर आयएनएस वगीर नौदलात सामील होत आहे. प्रकल्प ७५ अंतर्गत कलवरी वर्गाच्या ६ पाणबुड्या तयार केल्या जात आहेत, त्यापैकी ४ भारतीय नौदलात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत आणि पाचवी २३ जानेवारी रोजी सामील होत आहे. कलवरी वर्गाची पाणबुडी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे.
कलवरी वर्गाच्या ६ पाणबुड्या मुंबईतील माझगाव शिपयार्ड येथे बांधल्या जात आहेत, ज्यामध्ये ४ पाणबुड्या याआधीच भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. आयएनएस कलवरी, आयएनएस करंज, आयएनएस वेला आणि आयएनएस खांदेरी भारतीय नौदलात सेवा देत आहेत आणि आता आयएनएस वगीर देखील नौदलात सामील होण्यासाठी सज्ज आहे.
६७ मीटर लांब, २१ मीटर उंच या पाणबुडीचा वेग पाण्याच्या वर ताशी २० किलोमीटर आणि पाण्याखाली ताशी ४० किलोमीटर असेल. ५० हून अधिक खलाशी आणि नौदल अधिकारी त्यात काम करू शकतात, यासह, या पाणबुडीमध्ये १६ टॉर्पेडो, खाणी, क्षेपणास्त्रे, सर्वकाही सुसज्ज असेल.