नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे मोदी सरकारच्या धोरणांविरुद्ध देशव्यापी आंदोलन छेडण्याची तयारी करीत आहेत. लोकांनी अन्यायाविरुद्ध लढावे, घाबरू नये, असे आवाहन करतानाच त्यांनी ‘भारत छोडो आंदोलना’च्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या ‘करा किंवा मरा’ या घोषणेला नव्याने अर्थ देण्याचे टष्ट्वीटद्वारे आवाहन केले.राहुल गांधी यांचे टष्ट्वीट त्यांच्या पुढील कार्य योजनेचे संकेत देत असून, कोरोनाचा काळ संपताच आंदोलनाच्या तयारीला ते लागल्याचे दिसत आहे. या मोहिमेत राहुल गांधी संपूर्ण देशाचा दौरा करणार असून, गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना देशभर पदयात्रा करण्याचा सल्ला दिला होता, हे येथे उल्लेखनीय.राहुल गांधी आपल्या या मोहिमेसाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करू इच्छित आहेत. रोहन गुप्ता हे सध्या सोशल मीडियाचे काम पाहत आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिव्या स्पंदना (राम्या) अदृश्य झाल्या होत्या. त्या आता पुन्हा परतल्या आहेत. त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असली तरी त्यांच्याकडे पुन्हा सोशल मीडियाची जबाबदारी अद्याप सोपवलेली नाही. राम्या यांच्या सेवांचा राहुल गांधी कशा प्रकारे उपयोग करून घेतील, हे स्पष्ट व्हायचे आहे. राम्या यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बराच काळ सोशल मीडियाचे काम पाहिले होते. सध्या राहुल यांच्या समवेत कौशल विद्यार्थी, निखिल अल्वा यांच्यासारखे जुने सहकारीही काम करीत आहेत. सॅम पित्रोदा हे या सहकाऱ्यांसमवेत राहुल यांची प्रतिमा आणखी उजळ करण्यासाठी मदत करीत आहेत.
अन्यायाविरुद्ध लढा, घाबरू नका- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 2:49 AM