चीनचा मुकाबला एकजुटीने करा; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:47 AM2023-06-10T05:47:07+5:302023-06-10T05:47:58+5:30
पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट दिल्याने देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘चीनचा मुकाबला एकजुटीने आणि धोरणात्मकदृष्ट्या केला पाहिजे’, असे मत व्यक्त करीत उत्तराखंडमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चीनने केलेल्या बांधकामाच्या बातम्यांवरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
‘आता उत्तराखंडमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बांधकामामुळे प्रादेशिक अखंडतेवर अतिक्रमण होत आहे. पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट दिल्याने देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. चीनशी धोरणात्मकदृष्ट्या एकत्र लढले पाहिजे, बढाई मारून नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाचे छायाचित्रही शेअर केले.
सैन्याची तैनाती ही मुख्य समस्या : जयशंकर
जयशंकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘भारतालाही चीनसोबतचे संबंध सुधारायचे आहेत; परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सीमा भागात शांतता आणि शांतता असेल. चीन आघाडीवर सैन्याची तैनाती ही दोन्ही देशांमधील संबंधांमधील मुख्य समस्या आहे.’