शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

१० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत

By admin | Published: February 15, 2017 9:12 PM

१० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत

अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत १० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत होत आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये १० जण निवडून येणार असल्याने १० विद्यमानांचा पराभवही निश्चित आहे. विद्यमान नगरसेवकांमधील या लढती तुल्यबळ होण्याचे संकेत असल्याने राजकीय ज्वर तापू लागला आहे.प्रभाग १ शेगाव रहाटगावमधील जागेवर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक राजू मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण मेश्राम समोरासमोर ठाकले आहेत. तर विलासनगर मोरबाग प्रभागातील ह्यकह्ण जागेवर शिवसेनेच्या रेखा तायवाडे आणि जनविकास काँग्रेसच्या कुसूम साहू रिंगणात आहेत. साहू यांना यंदा भाजपची उमेदवारी मिळालेली आहे.प्रभाग ७ मधील ह्यडह्ण जागेवर भाजपचे संजय अग्रवाल आणि अपक्ष दिनेश बुब यांच्यात लढत होईल. प्रभाग ८ मधील ह्यडह्ण जागा जिंक ण्यासाठी अपक्ष अंबादास जावरे आणि कॉंग्रेसचे बबलू शेखावत यांच्या राजकीय लढाई होईल. प्रभाग ९ एसआरपीएफ मधील ह्यअह्ण जागेवर मालती दाभाडे आणि विजय बाभुळकर परस्परांसमोर ठाकले आहेत. तर याच प्रभागातील ह्यकह्ण जागेवर ममता आवारे आणि सपना ठाकूर या विद्यमान नगरसेविका समोरासमोर आहेत. रुख्मिनीनगर-विवेकानंद कॉलनी या प्रभागातील सर्वसाधारण ह्यडह्ण जागेवर हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. येथे भाजपकडून नितीन देशमुख आणि कॉंग्रेसकडून प्रदीप हिवसे हे विद्यमान नगरसेवक निवडणूक लढत आहेत. राजापेठ -संत कंवरराम प्रभागातील ह्यडह्ण जागेवर राजेंद्र महल्ले आणि अमोल ठाकरे परस्परांसमोर उभे आहेत. महल्ले यांनी युवा स्वाभिमानची उमेदवारी मिळविली तर ठाकरे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.प्रभाग १९ साईनगर ह्यकह्ण या जागेसाठी शिवसेनेच्या तिकीटावर मंजुषा जाधव आणि काँग्रेसच्या तिकीटावर संगिता वाघ नशिब आजमावत आहेत. याशिवाय जुनीवस्ती बडनेरा ह्यबह्ण जागेवर भाजपच्या विद्यमान नगरसेविका छाया अंबाडकर आणि जयश्री मोरे यांनी परस्परांना राजकीय आव्हान दिले आहे. जयश्री मोरे या राकॉफ्रंटच्या नगरसेविका होत्या. मात्र त्या तुर्तास अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. एकुणच विद्यमान सदस्यांच्या लढतीने सदर प्रभागातील निवडणुका चर्चेत आल्या आहेत. प्रचारादरम्यान आरो- प्रत्यारोपाच्यता फैरी झडत आहेत. प्रचारासाठी वेगवेगळे फंडे देखील वापरले जात आहे.