नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या झटापटीनंतर, सीमेवरील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे. नुकतेच, भारतीय हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया दोन दिवसांच्या लेह दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. हे दोन्हीही एअरबेस कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी महत्वाची आहेत. तसेच या दौऱ्याबरोबरच भारतीय लढाऊ विमानंही पुढील हवाई एअरबेसवर पाठवण्यात आली आहेत.
चीनसोबत तणाव वाढल्यानंतर हवाई दलाने फायटर जेटसह विविध प्रकारची आवश्यक साधनेही चीनच्या नजीक असलेल्या हवाई भागात हलवली आहेत. लडाखच्या गलवान भागात 15 जूनला भारत आणि चिनी सैनिकांत हिंसक झटापट झाली होती. यात आपल्या 20 जवानांना विरमरण आले.
तणाव कमी करण्यासंदर्भात भारत आणि चिनी अधिकाऱ्यांत सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र, याचा परिणाम काय? तर चीनने भारताच्या 10 जवानांना ताब्यात घेतले होते. मात्र आता त्यांना सोडण्यात आले आहे. यातच सेना प्रमुखांचा लेह आणि काश्मीर दौरा अत्यंत महत्वाचा माणला जात आहे. या दौऱ्यात त्यांनी सैन्य स्थळांची पाहणी केली. असे सांगण्यात येते. यामुळेच त्यांच्या दौऱ्यासोबतच लढाऊ विमानंही सीमेजवळील एअरबेसवर तैनात करण्यात येत आहेत.
चीनचे 10,000 सैनिक -सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 'हवाई दल प्रमुख दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पूर्व लडाखमध्ये LAC बोरोबच, चीनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्या सर्व ठिकानांचा आढावा घेतला, जेथे 10,000 हून अधिक सैनिक चीनने एकत्र केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दल प्रमुखांनी आपल्या दौऱ्यादरम्यान 17 जूनला लेहमधील तर 18 जूनला श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. ही दोन्ही ठिकाणं पूर्व लद्दाखच्या सर्वात जवळ आहेत. तसेच पाहाडी भागात कुठल्याही विमानांसाठी अनुकूल आहेत. एवढेच नाही, तर ते चीनीवरही स्पष्टपणे नजर ठेवतात.
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'
हवाई दलाने सुखोई - 30 एमकेआय, मिराज 2000, जगुआर ही लढाऊ विमानांसह, अमेरिकन अपाचे हेलीकॉप्टर्स, चिनूक हेलिकॉप्टर्स आदी देखील महत्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत.
गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO