नवी दिल्ली : एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करुन तिला धमकी दिल्याप्रकरणी तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तमिळसाई सुंदरराजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ३ सप्टेंबर रोजी तुतीकोरिन विमानतळावरुन सोफियाला (२८)अटक करण्यात आली होती.आपल्या मुलीशी गैरवर्तन करून, तिला धमकाविल्याप्रकरणी सोफियाचे वडील ए.ए. सामी यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तमिळसाई यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.>काय आहे प्रकरण?लुई सोफिया व तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षा तामिळसाई सुंंदरराजन एकाच विमानाने प्रवास करत होत्या. तुतीकोरिनमध्ये पोहोचल्यानंतर सुंदरराजन या आपली बॅग घेण्यासाठी लगेज पट्ट्यापाशी पोहोचल्या. याचवेळी सोफियाने हुकुमशाही भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सुंदरराजन आणि सोफिया यांच्यात वाद झाला. सुंदरराजन यांच्या स्वागतासाठी आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही तिला वाईट वागणून दिली आणि धमकावले. त्यानंतर सुंदरराजन यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोफियाला अटक केली. तिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करा; कोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 4:04 AM