शेतजमीनींचे बेकायदेशीर तुकडे करणार्यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: April 01, 2016 12:36 AM
जळगाव- शहर व परिसराला लागून असलेल्या बर्याचशा कृषी/शेती जमिनींना रितसर बिनशेती परवानगी न घेता लेआऊट मंजूर न करता बर्याचशा लोकांनी गरीब व भोळ्या जनतेला स्वस्त भावाचे आमिष दाखवून कायदा माहित असल्यावरही अश जमिनींचे बेकायदेशीरपणे स्वसमजुतीचा नकाशा तयार करुन त्यास कुठलीही मान्यता न घेता त्याचे तुकडे विकलेले आहेत. सदर शेत तुकड्यांना खडे प्लॉट म्हणून विक्री करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत या परिस्थितीला भाळून सर्वसामान्य गोरगरीब नागरिक बळी पडलेले आहेत. त्यामुळे उतार्यावर असंख्य नावांची गर्दी जमा होते. तसेच रितसर मालमत्ता नसल्यामुळे कुठलीही रस्ते, गटार वगैरे सुविधा विकसीत होत नाही व संबंधितांना नियमानुसार बांधकाम परवानगी सुद्धा मिळत नाही. सदरचा प्रकार हा बहुतांशी मेहरुण व आव्हाणे परिसरात झालेला आहे, त
जळगाव- शहर व परिसराला लागून असलेल्या बर्याचशा कृषी/शेती जमिनींना रितसर बिनशेती परवानगी न घेता लेआऊट मंजूर न करता बर्याचशा लोकांनी गरीब व भोळ्या जनतेला स्वस्त भावाचे आमिष दाखवून कायदा माहित असल्यावरही अश जमिनींचे बेकायदेशीरपणे स्वसमजुतीचा नकाशा तयार करुन त्यास कुठलीही मान्यता न घेता त्याचे तुकडे विकलेले आहेत. सदर शेत तुकड्यांना खडे प्लॉट म्हणून विक्री करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत या परिस्थितीला भाळून सर्वसामान्य गोरगरीब नागरिक बळी पडलेले आहेत. त्यामुळे उतार्यावर असंख्य नावांची गर्दी जमा होते. तसेच रितसर मालमत्ता नसल्यामुळे कुठलीही रस्ते, गटार वगैरे सुविधा विकसीत होत नाही व संबंधितांना नियमानुसार बांधकाम परवानगी सुद्धा मिळत नाही. सदरचा प्रकार हा बहुतांशी मेहरुण व आव्हाणे परिसरात झालेला आहे, तरी असे खडे प्लॉट विकणार्या मूळमालकांवर भादंवि कलम ४२० अन्वये चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे, सदर पत्राची दखल न घेतल्यास आम्हास जनहितार्थ मा.उच्च न्यायालय येथे आपल्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करावी लागेल.