शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खोटे गुन्हे दाखल करणे पडले महागात; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला ५ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 07:26 IST

१० ऑक्टोबर २०१५ रोजी महिला पोलिस उपअधीक्षकाच्या वडिलांनी हिसारच्या पोलिस ठाण्यात  प्रतीक व वडिलांविरुद्ध कलम ‘४९८ अ’अंतर्गत एफआयआर दाखल केला

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली - अनेकदा त्रास देण्यासाठी तक्रारदाराकडून अनेक कलमांतंर्गत खोटे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, आता खोटे गुन्हे दाखल करणे महागात पडणार आहे. त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आयपीसी ‘४९८ अ’चे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चपराक बसणार आहे.

जून २०१४ मध्ये हिसार (हरयाणा) येथील चार्टर्ड अकाउंटंट प्रतीक बन्सल आणि उदयपूरच्या महिला पोलिस उपअधीक्षक इंटरनेटद्वारे संपर्कात आले. २१ मार्च २०१५ रोजी त्यांचे लग्न झाले. १० ऑक्टोबर २०१५ रोजी महिला पोलिस उपअधीक्षकाच्या वडिलांनी हिसारच्या पोलिस ठाण्यात  प्रतीक व वडिलांविरुद्ध कलम ‘४९८ अ’अंतर्गत एफआयआर दाखल केला. पाच दिवसांनंतर त्यांनी पोलिस स्टेशन, उदयपूर, राजस्थान येथे ‘४९८ अ’चा दुसरा गुन्हा दाखल केला. तक्रारी होत्या. दरम्यान, हिसार न्यायालयाने प्रतीकची निर्दोष मुक्तता केली.

प्रकरण सुप्रीम कोर्टात...हिसार पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आणि खटला सुरू झाल्यानंतर, प्रतीक बन्सलने उदयपूर येथे नोंदवलेला दुसरा एफआयआर रद्द करण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हायकोर्टाने ती फेटाळल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले.

पतीला छळण्यासाठी यंत्रणेचा गैरवापरन्यायमूर्ती विक्रम नाथ व प्रशांत कुमार मिश्रा यांनी पतीला छळण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करत प्रतीकची याचिका मान्य केली. याशिवाय खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिला डीवायएसपींच्या वडिलांना ५ लाख भरण्याचे आदेश दिले. यातील २.५ लाख प्रतीकला व २.५ लाख विधिसेवा समितीला देण्यात येतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय