ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १८ - भारतीय वायुदलात शनिवारी प्रथमच महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश झाला असून तीन महिला सैनिकांचा समावेश असलेली ही तुकडी सकाळी वायुदलात दाखल झाल्याने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.
अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत, अशी त्या तीन महिला वैमानिकांची नावे असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांच्या उपस्थितीत दुंडीगल येथील अकादमीतील पासिंग आऊट परेडनंतर त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारली. या तिघींनीही १५० तासांच्या विमान उड्डाणाचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले असून पासिंग परेड नंतर त्यांना आणखी सहा महिन्यांसाठी प्रगत जेट प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल व त्यानंतर त्यांचा समावेश नियमित तुकडीत करण्यात येईल.
१८ जून रोजी भारतीय हवाई दलाला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळणार असल्याची घोषणा, भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप रहा यांनी महिलादिनी म्हणजेच ८ मार्च रोजी केली होती. त्याप्रमाणे या तीन महिला फायटर पायलट यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आजच्या पासिंग आऊट परेडनंतर त्या वायु दलात दाखल होतील.
'आम्ही १९९१ मध्ये महिलांना वैमानिकाच्या रूपात सामील केले होते. परंतु ते फक्त हेलिकॉप्टर्स आणि परिवहन (विमान) यापुरतेच मर्यादित होते. आता महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सामील करण्याच्या भारतीय वायुदलाच्या (आयएएफ) प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी संरक्षण मंत्रालयाचे आभार मानतो. लवकरच म्हणजे १८ जून रोजी वायुसेनेत महिला लढाऊ वैमानिक दिसतील,’ असे अरूप राहा यांनी सांगितले होते.
त्यानुसार पहिल्या तुकडीसाठी तीन महिलांना प्रशिक्षण देण्यात आले होते. आज पासिंग परेड पुर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेण्यात आले असून त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या आहेत. मात्र आणखी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतरच त्यांचा नियमित तुकडीत समावेश होईल.
Avani Chaturvedi, Mohana Singh and Bhawna Kanth, female pilots who will be inducted in IAF fighter squadron shortly pic.twitter.com/wmAY106snR— ANI (@ANI_news) June 18, 2016
Defence Minister Manohar Parrikar at the passing out parade at the Indian Air Force Academy in Hakimpet(Hyderabad) pic.twitter.com/iaJP6lda7x— ANI (@ANI_news) June 18, 2016
Hyderabad: Passing out parade underway at the Indian Air Force Academy in Hakimpet pic.twitter.com/Y5fQ2Hgfcq— ANI (@ANI_news) June 18, 2016
Hyderabad: Passing out parade underway at the Indian Air Force Academy in Hakimpet pic.twitter.com/Y5fQ2Hgfcq— ANI (@ANI_news) June 18, 2016