नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे शेवटचे भाषण केले. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीतील हे शेवटचे अधिवेशन होते. या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 16 लोकसभेतील मोदींचे हे शेवटचे भाषण होते. या भाषणात मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. गेल्या 4.5 वर्षात मोदी सरकारने देशात केलेल्या प्रगतीचा पाढा मोदींनी वाचला. तसेच, मोदींना वाईट म्हणा, भाजपाला वाईट म्हणा, पण हे करता करता देशाला वाईट म्हणू नका, असे म्हणत मोदींनी विरोधकांना टार्गेट केलं. तसेच, सध्याची विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', असेच असल्याचं मोदींनी म्हटलं.
आता लोकांमध्ये जाऊन आम्ही केलेल्या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणार आहोत. देशातील कोट्यवधी तरुणांचा मी आभारी आहे, जे यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. देशातील संसदीय लोकशाही प्रणालीची ते घटक बनत आहेत. त्यासोबतच, एका हलक्या-फुलक्या वातावरणातील निवडणुकांसाठी मी सर्वांनाच शुभेच्छा देतो, असे मोदींनी म्हटले.
आव्हानांना जे घाबरतात, ते नवीन समस्या निर्माण करतात. आव्हानांना आव्हान देण्याचं काम आम्ही करत आहोत. लोकसभेत 1947 ते 2014 एवढचं मी आज ऐकलं. बीसी म्हणजे बिफोर कॉन्ग्रेस आणि एडी म्हणजे एफ्टर, असाच प्रकार आहे. काँग्रेसपूर्वी आणि काँग्रेसनंतरच देश असंच विरोधकांचा म्हणणं असल्याचे मोदींनी म्हटले. तर, देश गेल्या 55 महिन्यात मोठ्या प्रगतीपथावर असल्याचं मोदींनी सांगितलं. भारताची अर्थव्यवस्था आज देशात 6 व्या क्रमांकावर आहे. काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात भारतात होत असल्याचंही मोदींनी सांगितल. तसेच साडे चार वर्षात 10 कोटी शौचालय बांधले, 55 महिन्यात 50 टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच काम केल्याचंही मोदींनी सांगितलं. दरम्यान, महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याचा आरोपही मोदींनी केला.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : -
काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे आत्महत्या करणे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय
देशातील वायूसेना दुबळी राहावी, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, त्यामुळेच राफेल प्रकरणावर फिजूल चर्चा
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाकण्याचं महात्मा गांधींनी म्हटलं होतं.
काँग्रेसमुक्त भारत ही केवळ माझी नाही, तर महात्मा गांधींची इच्छा होती,