लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविराेधात करणाऱ्या हजाराे शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यासाठी दिल्ली पाेलिसांनी सशर्त परवानगी दिली. शेतकरी नेत्यांसाेबत प्रदीर्घ चर्चेनंतर बुरारी भागातील मैदानात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यासाठी परवानगी देण्यात आली. चिघळलेली परिस्थिती त्यानंतर नियंत्रणात आली. तरीही तणाव कायम हाेता. पाेलीस संरक्षणात शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात आला.
कृषी कायद्याविराेधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलाे’ची हाक दिली हाेती. पंजाब आणि हरयाणातून माेठ्या संख्येने शेतकरी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी धडकले. त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर परिस्थिती चिघळली. सकाळपासून अनेक तास दिल्ली पाेलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू हाेता. हरयाणा सीमेवर विविध ठिकाणी ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये बसून हजाराे शेतकरी धडकले हाेते. त्यांनी बॅरिकेड्स माेडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले. शेतकऱ्यांना राेखण्यासाठी माेठ्या प्रमाणात पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. ड्राेनच्या माध्यमातूनही आंदाेलनावर नजर ठेवण्यात येत हाेती. अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
‘आप’ने परवानगी नाकारलीदिल्लीतील ९ मैदानांवर तात्पुरते तुरुंगा उभारून ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तिथे ठेवण्यासाठी दिल्ली पाेलिसांनी ‘आप’सरकारकडे परवानगी मागितली हाेती. परंतु, ती नाकारण्यात आली.
राहुल गांधींचे ट्वीटकाॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मी शेतकऱ्यांसाेबत’ असे ट्वीट करुन लिहिले की, माेदी सरकारला शेतकरीविराेधी काळे कायदे मागे घ्यावेच लागतील.
निरंकारी मैदानाचा पर्यायकाेराेनाचे कारण देउन शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात आला हाेता. त्यावरून शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. हरयाणा, पंजाब, राजस्थानसह सहा राज्यातील शेतकरी आंदाेलन करण्यासाठी निघाले हाेते. त्यांना आता बुरारी भागातील निरंकारी मैदानात परवानगी देण्यात आली आहे.