लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले मंत्री कपिल मिश्रा यांचे सोमवारी आम आदमी पक्षाने प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले. तत्पूर्वी मिश्रा यांनी वार्ताहरांशी बोलताना मला पक्षातून काढून दाखवावे, असे उघड आव्हान दिले होते. अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. मिश्रा यांनी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर नव्याने हल्ला केला. केजरीवाल यांच्या मेहुण्यासाठी ५० कोटी रुपयांचा एक व्यवहार करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. केजरीवाल यांच्या मेहुण्यासाठी दहा कोटी रुपयांचे बोगस बिल करण्यात आल्याचेही मिश्रा यांनी ठामपणे सांगितले.
अखेर कपिल मिश्रा आपमधून निलंबित
By admin | Published: May 09, 2017 12:40 AM