नवी दिल्ली : कुस्तीपटू नरसिंग यादवला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) कडून दिलासा मिळाला आहे. डोपिंगप्रकरणी नरसिंग यादव याच्यावर घालण्यात आलेली बंदी नाडाने उठविल्यामुळे ते रिओ येथे आॅलिम्पिक स्पर्धेसाठी जाणार आहे. नरसिंग यादवला डोपिंगमध्ये अडकवण्यात आले होते, असे नाडाने स्पष्टपणे म्हटले आहे, तर या निर्णयामुळे आपण आनंदी असून, आपल्याला न्याय मिळाला आहे. आपण आॅलिम्पिकला जात असून, तिथे पदक मिळवण्यासाठी आपण तयारीला लागलो आहोत, असे नरसिंग यादवने म्हटले आहे. रिओ आॅलिम्पिकपूर्वी डोपिंग टेस्टमध्ये कुस्तीपटू नरसिंग यादव पकडला गेला होता. यात त्याचा काही दोष नसून त्याच्या ड्रिंक्समध्ये काहीतरी भेसळ झाल्याचे सांगत नाडाने त्याला मोठा दिलासा दिला असून त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या रिओ आॅलिम्पिकमध्ये त्याला भाग घेता येणार आहे. नरसिंगने दोन वेळा आॅलिम्पिक पदक जिंकलेल्या सुशीलकुमार विरु द्ध न्यायालयीन लढाई जिंकताना रिओ आॅलिम्पिक प्रवेश मिळवला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मला फार आनंद झाला. माझा पाठिंबा आधी देखील होताच. आजही आहे आणि उद्याही राहील. जा, रिओमध्ये माझ्यासाठी आणि देशासाठी पदक जिंकून आण!’ कुस्तीवर अशी वेळ येणे वेदनादायी आहे. हा खेळ माझा प्राण असल्याने खेळाच्या हितासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. - सुशिल कुमार
अखेर नरसिंगची डोपिंगमधून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2016 6:10 AM