वॉशिंग्टन/नवी दिल्ली : नोटाबंदी आणि विकासदर यामुळे केंद्र सरकारवर टीका होत असतानाच जागतिक बँकेच्या अहवालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. या अहवालानुसार, भारताने बिझनेस रँकींगमध्ये (उद्योगस्रेही देशांच्या यादीत) मोठी झेप घेतली आहे. गत वर्षभरातील कामगिरीमुळे भारताने या यादीत यंदा ३० अंकांची झेप घेत १०० वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच ही माहिती दिली.कर आकारणी, परवाना देणे, गुंतवणूकदारांना संरक्षण यामुळे हे यश मिळाले. जागतिक बँकेने म्हटले की, भारत त्या देशामध्ये आहे ज्या देशाने संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत.पहिल्या ५० देशांत येणे हे आमचे लक्ष्य आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताची झेप,अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 6:47 AM